home page top 1

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळली

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा दरड कोसळली आहे. द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ आज दुपारी चारच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. दगड आणि माती महामार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक मंदावली असून या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास याच ठिकाणी दरड कोसळली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरक्षा पत्रे लावण्यासाठी बंद करण्यात आली होती. आजच्या घटनेत सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी द्रुतगती महामार्ग धोकादायक बनला असून वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मागील तीन वर्षापासून आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून आपघात अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले होते.

वारंवार दरड कोसळत असल्याने राज्य सरकारने या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डोंगरांना सुरक्षा जाळ्या बसवल्या आहेत. जाळ्यांचे आच्छादन बसवलेल्या डोंगरावरूनच दरड कोसळत असल्याने पुन्हा जाळ्या बसवण्याची मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

 

Loading...
You might also like