Coronavirus : बंद घरात ‘कोरोना’चा धोका जास्त, ‘या’ 3 उपायांनी सुधारा हवेची क्वालिटी

नवी दिल्ली : वृत्त संस्था- कोरोना (corona) ची नवी प्रकरणे दररोज नवा रेकॉर्ड करत आहेत. कोरोना (corona ) च्या रूग्णांची संख्या वाढल्यानंतर गंभीर रूग्णांनाच हॉस्पीटलमध्ये दाखल केले जात आहे. आता सुरूवातीची लक्षणे असलेल्या रूग्णांना घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा स्थितीत घरात कुणी कोरोना रूग्ण असेल तर कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाचा धोका वाढला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, कोराना रूग्णाच्या बोलण्याने, गीत गाणे किंवा वेगाने श्वास घेण्याने सुद्धा कुटुंबातील लोकांना कोरोनाचा धोका वाढतो. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही उपयोग होत नाही.

अमेरिकन आरोग्य एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या नव्या गाईडलाइन्सनुसार कोरोना व्हायरस हवेत तरंगत असलेल्या छोट्या कणांच्या माध्यमातून सुद्धा पसरू शकतो. अशाप्रकारे व्हायरस पसरण्याचे कारण खराब व्हेंटिलेशन आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोनापासून वाचण्यासाठी घरापेक्षा चांगले बाहेरचे वातावरण आहे. तोंडातून बाहेर पडलेले छोटे ड्रॉपलेट्स आणि कण इतरांना संक्रमित करत असल्याने अशावेळी घरातील खराब व्हेंटिलेशन व्हायरस आणखी वाढवू शकते.

हवेची क्वालिटी अशी सुधारा

1 रात्री खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा
रात्री झोपताना खिडक्या उघड्या ठेवल्याने आतील हवेची क्वालिटी चांगली राहील आणि आद्रता कमी होईल. मात्र, थंडीत या उपायाबाबत थोडे सतर्क राहावे.

2 एग्झॉस्ट लावा
घरात हवेचे व्हेंटिलेशन चांगले ठेवण्यासाठी चांगला एग्झॉस्ट फॅन लावा.

3 खोलीत छोटी झाडे लावा
घरात लावलेली झाडे आतील हवा शुद्ध करण्याचे काम करू शकतात. ही झाडे आता कार्बन डाय ऑक्साइडचा स्तर, नुकसानकारक टॉक्सिन्स सुद्धा कमी करतात.