दौंड तालुक्यातील चार जण पुणे जिल्ह्यातून तडीपार

यवत पोलिसांची कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यात जबरी चोरी आणि दरोड्यांचा प्रयत्न करणारी अभिषेक दोरगे याची टोळी पुणे जिल्हयातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आली आहे. याबाबत यवत पोलिसांनी माहिती दिली आहे.

अभिषेक दोरगे, रविराज उर्फ अण्णा वाबळे, दिपक घिगे, परमेश्वर शिंदे अशी हद्दपार केलेल्यांची नावे असून ते दौंड तालुक्यातील यवत परिसरात राहणारे आहेत.

या टोळीला पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकारिता हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर यवत पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल आहेत.

हि कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मिना, दौंडचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो.ह संदीप कदम, पो.ह. भिसे, पो.ना.सचिन होळकर, रायकर, तारळकर यांनी केली.

या टोळीकडून दौंड तालुका आणि परिसरात कुठल्याही प्रकारचे भय व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच सर्व सामान्य नागरिकांचे, त्यांच्या जीविताचे आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी हि कारवाई करण्यात आली आहे.