चहावाल्याच्या ‘टीप’वरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटले

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेत जमा करण्यासाठी निघालेल्या पंपावरील कर्मचाऱ्यावर हल्ला करून १२ लाख ४० हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना ३१ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली होती. ही घटना मुरबाड रोडवडील विजय बाग परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून पेट्रोल पंपाजवळील एका चाहावाल्याने चोरट्यांना टीप दिल्याचे तपासात समोर आले आहे.

सचिन विनोद शिरोडकर, सोमनाथ उर्फ गणेश खंडागळे, नितीन पवार, रुपेश रमेश म्हात्रे, सोनू दिलीप सुरवसे आणि वैभव विलास भास्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार सचिन शिरोडकर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे अपर पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, सुरेश डांबरे, अविनाश पाळदे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, भालेराव, सुनिल पवार, पोलीस शिपाई गोसावी, पवार, पोलीस नाईक सुनिल पवार, अमोल गोरे, नरेंद्र बागुल, रुपेश सावळे, दिपक गडगे, चिंतामण कातकडे, पोलीस शिपाई रविंद्र हासे, गावित, यांच्या पथकाने केली.