चाळीसगाव रोड पोलीस हद्दीतील घर फोडीतील चोरटे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – चाळीसगांव रोड पोलीस स्टेशनला दिनांक १९/०२/२०१९ रोजी फिर्यादी नामे अब्दुल कलाम मोहम्मद
इस्लाम अन्सारी वय ३८ रा मुस्लीम नगर मुन्शी मज्जीद जवळ हुसेन हॉटेलच्या मागे धुळे यांचे तक्रारी वरुन भाग ५ गुरन २३/२०१९ भादवी कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक ०९/०२/२०१९ रोजी यातील फिर्यादी व त्यांचा परीवार लग्न समारंभा करीता दुपारचे सुमारास गेला असता त्याचे राहत्या घरात कोणीतरी अज्ञात इसमांनी घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम ३,२५०००/- घर फोडी चोरी करुन नेली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सपोनी तेजाळे यांचे कडे देण्यात आला.

मा.पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , पोलीस निरीक्षक कुबेर ,चवरे याच्या मार्गदर्शनाखाली नेमणूकीस असलेले सपोनि तेजाळे सह शोध पथकाचे कर्मचारी पोकॉ/ जोयेब पठाण, पोकॉ/प्रेमराज पाटील, पोकॉ/शेंडे, पोकॉ/माळी अशांनी तपास करत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील प्रमुख आरोपी नामे १) शाहरुख शेख उर्फ बोबड्या अजीज शेख वय २८ रा मारुती मंदिरा जवळ आझादनगर घर नं ५४७ धुळे २) मोसीन अब्दुल रहेमान मलाड वय ३० रा मिल्लत नगर अबुबखर मजीद
जवळ आझादनगर धुळे ३) शेख अरबाज शेख इलीयास वय १७ रा मदरसा दरसुल जवळ आझादनगर धुळे.तिघांना दिनांक २२/०२/२०१७ रोजी ०8.११ वाजता अटक करण्यात आली.

यातील आरोपी क्र ०१ याचे कडुन गुन्ह्यातील गेला माला मधील २,००,०००/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. व आरोपी क्र ०३ यांचे वाटणीस आलेले १०,०००/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.