RTE प्रवेश प्रक्रिया कायदेशीर नियमानुसार करावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत असे निदर्शनात येत आहे की अनेक एजंट लोक या योजनेच्या नियमावलीत पात्र नसलेल्या पालकांकडून पैसे मागून प्रवेश प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आमिष दाखवत आहेत. तरी प्रवेश प्रकिया कायदेशीर नियमानुसार करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक पुणे, औदुंबर उकिरडे यांना सादर करण्यात आले.

या निवेदनाला उत्तर देताना उकिरडे यांनी सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी तातडीने बैठकीबाबत आदेश दिले.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत खरोखरच आर्थिक दुर्बल घटक पालक योजनेपासून वंचित रहात आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया असली तरी अनेक ठिकाणी सुरु असलेल्या या एजंटगिरीला बळी पडून पालकांची होत असलेली फसवणूक थांबविण्यात यावी. खरोखर आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेचा लाभ मिळावा. तीन फेऱ्यांमध्ये राबविली जाणारी ही प्रक्रिया एकाच फेरीत राबविताना कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाने द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करत आहोत असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदेश कोतकर, ,रवी गाडे,अमोल गायकवाड, आकाश नागरे,साहिल मरे,आधी उपस्थित होते