देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा सत्ताधारी पक्षास विसर : साने

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा, पर्यावरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. या हेतूने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक  गणेश मंडळाना प्रोत्साहान मिळावे त्यातून  सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतूने विधायक प्रबोधनात्मक देखावे सादर केले जावेत त्यासाठी पालिकेच्या वतीने गणेशोत्सव स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. समाजप्रबोधनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या मंडळांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र बक्षीस दिले जाते. बक्षीस वितरण दुस-या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या एक महिन्यापूर्वी केले जाते. त्यामुळे विजेत्या मंडळांना बक्षीसाची रक्कम मंडळास देखावा वा इतर कार्यासाठी उपयोगी पडते. मात्र सत्ताधारी भाजपला याचा विसर पडला आहे. या वर्षी या पंरपरेमध्ये खंड पडला असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d3c17ec-b8bd-11e8-ac64-3d75e8f82b56′]

यंदाचा गणेशोत्सव सुरु होऊन सुध्दा महापालिकेचा बक्षीस समारंभ झालेला नाही. महानगरपालिकेने या शहारातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी म्हणून गेली अनेक वर्षे हि परंपरा कायम राखली आहे. मात्र या वर्षी गणेशाची स्थापना झाली तरी देखील महानगरपालिका बक्षीस वितरण समारंभ घेत नाही हि खेदाची बाब आहे. जो भारतीय जनता पक्ष प्रभू रामचंद्रचा जप करुन कडवे हिंदुत्व नेतृत्व असल्याचा डांगोरा पिटत सत्ता मिळवली. मात्र हिंदुचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या पारीतोषक वितरणाचा भाजपला विसर पडला. हि या शहरातील तमाम नागरीकांच्या दृष्टीने दुर्दैवाची व खेदाची बाब आहे.

हेही वाचा- विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने पोलिसांची कारवाई 

या पूर्वीची अनेक वर्षाची परंपरा गणेशोत्सव सुरु होण्याअगोदर एक महिना पारीतोषक वितरण केले जाते, जेणे करुन मिळण्या-या बक्षिसाच्या रकमेतून गणेश मंडळांना याचा उपयोग सजावट खर्चासाठी होतो.  त्यामुळे शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठी  नाराजी पसरली  आहे.  मांगल्याचे प्रतिक समजल्या जाणा-या या गणरायाला देखील भूलथापातून सोडले नाही. हे या शहरातील शहरवासियांचे दुर्दैव आहे.  पालिका व पोलिस प्रशासन यांच्या मार्फत भोसरी येथे शांतता बैठकीमध्येही गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी याबाबत विचारणा केली होती.  भाजपच्या सत्तारुढ पक्षनेते यानी न्यायालयाचा निर्णय आणि शासनाच्या अध्यादेशामुळे महापालिकेस उत्सव,सण,महोत्सव व जयंतीसाठी खर्च करता येणार नाही त्यामुळे बक्षीस वितरणाचा प्रश्व निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c02228c-b8bd-11e8-9282-21b1aa2e0c49′]

पालिकेतील सर्व गटनेत्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे सांगितले परंतु  हा अध्यादेश आल्यानंतरही महापालिकेमार्फत महोत्सव, जयंत्या साजरे करण्यात आले आहेत. एवढेच काटकसरीच्या नावाखाली हार, फुले ,गुच्छ बंद केल्याची नोंटकी करुन आपण काटकसर करीत आहोत हे जनतेला दाखवण्याचा नाटकी ढोंग शहरतील सुज्ञ नागरीकांना समजले आहे. एकीकडे कचरा निविदा, पंतप्रधान निवास योजना निविदा, वेस्ट टू एनर्जी निविदा अशा मोठ्या  प्रकल्पामध्ये कोट्यावधी रुपयांचा भष्ट्राचाराचे घोटाळे समोर येऊ लागले आहेत. खुद्द भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये गैरकारभार होत असल्याने याची चौकशी करावी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे शहरवासियांना कळून चुकले आहे.

हेही वाचा- दोन दिवसांच्या चिमुरडीला रुग्णालयाबाहेर सोडून आई फरार 

यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक चळवळीस गालबोट लागले आहे. त्यामुळे भाजपच्या या प्रवृत्तीचा  जाहीर तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.