आता एवढेच बाकी होते … गुगल शिकवणार शास्त्रशुद्ध शेतीचे धडे ?

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

सध्या कोणत्याही गोष्टी बद्दल माहिती मिळवायची असेल तर आपण लगेचच गुगल सर्च करतो. मग ती एखादी रेसिपी असेल किंवा कोणात्याही ठिकाणाचा पत्ता. पण आता याही पुढे जाऊन भारतातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध शेती पद्धत गुगलने शिकवली तर यात बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण भारतातील शेतकर्‍यांनी शास्‍त्रीय पद्‍धतीने शेती करावी तसेच त्यांनी हवामानाबाबत जागरुक रहावे, यासाठी ‘गूगल’ने मदत करावी, अशी इच्छा भारताने व्यक्त केली आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f728c03-ad15-11e8-a158-8f67e341c961′]

भारताचे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद सध्या चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. कॅलिफोर्नियातील गूगलच्या मुख्‍यालयात कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी गूगल मुख्यालयाला भेट दिली. भारतातील शेतकर्‍यांनी शास्‍त्रीय पद्‍धतीने शेती करावी तसेच त्यांनी हवामानाबाबत जागरुक रहावे, यासाठी ‘गूगल’ने मदत करावी, अशी इच्छा भारताने व्यक्त केली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’453bde6c-ad15-11e8-a35b-c31dc0934f15′]

या भेटीत मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतातील शेतकर्‍यांनी शास्‍त्रीय पद्‍धतीने शेती करावी तसेच हवामानविषयी जागरुक राहण्‍यासाठी गूगलने मदत करावी, अशी इच्छा त्यांनी तेथील अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेवेळी केली. तसेच यावेळी डिजिटल ग्राम वर चर्चा करण्‍यात आली. यावेळी मंत्री रविशंकर प्रसाद म्‍हणाले, की गूगलमध्‍ये मोठ्‍या संख्‍येने भारतीय लोक काम करत आहेत ही आनंदाची गोष्‍ट आहे. यामध्‍ये गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि गूगल सर्चचे उपाध्यक्ष बेन गोम्स यांचा समावेश होता.

काेरेगांव भीमा अांदाेलन भडकावण्यासाठी पाच लाखाचे फडिंग 

यावेळी त्यांनी भेटीत इंटरनेटचा वापर कसा सहज करता येईल यावर चर्चा केली. तसेच भारतातील भाषा, आर्टिफीशिलय इंटेलिजेंस यावर चर्चा करण्‍यात आली. या भेटीचा मूख्‍य हेतू भारतात इंटरनेटचा वापर सहज आणि सुलभ करणे हाच आहे.

Please Subscribe Us On You Tube