Health Tips : चिंचेच्या रसात लपलंय निरोगी जीवनाचं रहस्य, जाणून घ्या चमत्कारी फायदे

नवी दिल्ली : चिंचेला आंबट-गोड चव यासाठी जगभरात ओळखले जाते. त्याच बरोबर भारतात तर चिंचेच्या नावाने बहुतेक लोकांच्या तोंडात पाणी येते. भारतात चिंचेचा वापर प्रामुख्याने पाणीपुरीपासून आंबट पदार्थ आणि चटणी बनवण्यासाठी केला जातो. चिंचेचा वापर दक्षिण भारतातील पाककृतीमध्ये एक सामान्य मसाला म्हणून केला जातो.

चवी बरोबरच, आरोग्यासाठी देखील चिंचेचे अनेक फायदे आहेत. यामुळे आता त्याची लागवडही मोठ्या प्रमाणात होत आहे. मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे देश चिंचेचे सर्वाधिक उत्पादक आहेत. अन्नाबरोबर जंतुनाशक गुणधर्म देखील चिंचेमध्ये आढळतात. ज्याचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘ए’ याचे भरपूर प्रमाण

चिंचेमध्ये मानवी शरीराच्या विकासासाठी अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन ‘सी’ आणि व्हिटॅमिन ‘ए’ सर्वाधिक प्रमाणात आढळतात. या पोषक द्रव्यांमुळे, आपल्या डोळ्यातील समस्या, सर्दी आणि कावीळच्या उपचारांमध्ये मदत होते. चिंचेचा वापर वजन कमी करण्यासाठी देखील केला जातो.

पाचक प्रणालीसाठी उपयुक्त

शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी, निरोगी पाचक प्रणाली असणे खूप महत्वाचे आहे. इमलीचा नियमित वापर केल्यास पाचन समस्या सुधारतात. चिंचेमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, मॅंगनीज आणि फायबर सारख्या खनिज घटकांचे प्रमाणही चांगले असते. चिंचेचा उपयोग अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पोटात सूज येण्यास खूप मदत करतो.

वजन कमी करण्यास मदत करेल

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी चिंचेचा रस उपयोगी आहे. चिंचेच्या रसामध्ये भरपूर हायड्रॉक्सिल ऍसिड आढळते. हे ऍसिड शरीरात तयार होणारी चरबी बर्न करणार्‍या एन्झाईमच्या निर्मितीस मदत करते. ज्यामुळे शरीराचे वजन वेगाने कमी होऊ शकते.

हृदयाच्या समस्येमध्ये फायदा होईल

चिंचेचा रस वापरल्याने शरीरात रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचा रस अँटीऑक्सिडेंटची पातळी वाढवितो, एलडीएल कमी करतो. चिंचेमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ‘सी’ शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचे परिणाम कमी होऊ शकतात.

जर आपणास आपले शरीर निरोगी करायचे असेल तर आपण आपल्या आहारात चिंच समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा वापर करू शकता.