सुरक्षारक्षकांनीच सराफाच्या घरातून ५१ लाख केले लंपास 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-

बोरिवली पूर्व येथील दाैलत नगरमध्ये असलेल्या अोयेसिस इमारतीमधील दोन सुरक्षारक्षकांनीच एका सराफाच्या घरावर डल्ला मारून तब्बल 51 लाख रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी सराफ व्यावसायिक असलेल्या शाह कुटुंबीय लोणावळा येथे पिकनिकला गेल्यानंतर पाळत ठेवून घरातून 45 लाख रुपयांची रोकड आणि सहा लाखांचे दागिणे असा एेवज चोरी केला आहे. दोन्ही चोरट्यांना पकडण्यासाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केल्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांनी सांगितले आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6c06c7c-88f3-11e8-b8dd-2de663e925bd’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 13 जुलै रोजी शाह कुटुंबीय पिकनिकसाठी लोणावळा येथे गेले होते. 14 जुलैला लोणावळ्याहून जेव्हा ते घरी परतले तेव्हा घराचा दवाजा उघडा दिसला. घराबाहेर पडताना एका सुरक्षारक्षकाने शाह कुटुंबाचे सामान सहाव्या मजल्यावरुन खाली आणले आणि ते गाडीमध्ये ठेवण्यासाठी मदत केली. शाह कुटुंबियांची गाडी बाहेर पडताच सुरक्षारक्षकाने जोडीदारासह चोरीचा कट आखला. दोघांनी गच्चीतून शाह  यांच्या घराच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. बेडरूमधील कपाट तोडले आणि दोघांच्या हाती ४५ लाखांची रोख रक्कम आणि ६ लाखांचे दागदागिने असे घबाड लागले.

तसेच चोरट्या सुरक्षा रक्षकांनी स्वतःच्या बचावासाठी सीसीटीव्हीचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्ड) मशीन देखील चोरी केली आहे. ऐवज घेऊन दोघांनी  मुंबई सोडल्याचा संशय पोलिसांना आहे. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांची विशेष पथके दोघांच्या मागावर असल्याची माहिती पिंपळे यांनी दिली. दोन्ही फरार सुरक्षारक्षक नेपाळचे रहिवासी असून काही वर्षांपासून या इमारतीत काम करत होते.