आँखेचा सीक्वल २०२० मध्ये येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

२००२ मध्ये आलेला आँखे हा चित्रपट एका बँक दरोड्यावर आधारित थरारपट होता. अमिताभ बच्चन यांची नकारात्मक भूमिका असलेला चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. याच चित्रपटाचा आता सीक्वल येत असून त्यात अमिताभ बच्चन पुन्हा खलनायकी भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे यात जॅकी चॅनही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

बर्थडे स्पेशल : अशोक पत्की, संगीतकार, गीतकार

आँखे या चित्रपटात विजय सिंग राजपूत या मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन होते, तर त्यांच्यासोबत सुश्मिता सेन, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल आणि परेश रावल यांच्याही भूमिका होत्या.आता आँखेच्या सिक्वलमध्ये सुशांत सिंग राजपूत आणि विकी कौशल मुख्य भूमिकांमध्ये दिसतील अशी चर्चा आहे. तसंच यावेळी बँकेऐवजी कॅसिनो दाखवण्यात येणार आहे .
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a64055d5-a864-11e8-be19-8364b0a822af’]
या चित्रपटाचं चित्रीकरण २०१९ मध्ये सुरू होणार असून २०२०मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार आहेत, असंही बोललं जात आहे.

Loading...
You might also like