अभ्यास केला नाही म्हणून सात वर्षांच्या मुलीची नखे पकडीने उपटली

बंगळुरू  :  वृत्तसंस्था

मुलांनी अभ्यास केला नाहीत तर शिक्षक त्यांना छडी मारतात, तर पालक एखादा धपाटाही घालतात. मात्र, बंगळुरुमधील एका महिलेने आपल्या सात वर्षाच्या भाचीचे नखेच पकडीने उपटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी मुलीवर आत्याचार केल्याप्रकरणी बाल अत्याच्यार कायद्यांतर्गत मुलीच्या आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’488c5b83-cbbf-11e8-a710-c3259b19c586′]

मुलीच्या हाताला झालेली जखम पाहून तिच्या आजीने तिला रुग्णालयात दाखल केले. तिला अभ्यासासाठी पेन्सिलही हातात धरता येत नव्हती. तसेच तिला हातही हलवता येत नव्हता. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ही साधीसुधी जखम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. अभ्यास करण्यासाठी आत्या नेहमी मुलीला मारहाण करत होती. अभ्यास करत असूनही तिने पकडीने माझे बोट दाबले आणि त्यानंतर तिने माझे नख उपटल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बाल अत्याचार कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. ते मुलीवर अत्याचार का करत होते याची पोलीस चौकशी करत आहेत.

[amazon_link asins=’B078124279,B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5585208d-cbbf-11e8-b7ef-6d08e24e043f’]

मुलीच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. तर वडील कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात राहत असल्याने ही मुलगी आत्याकडे राहात होती. तेथे राहणारी तिची आजी तिची देखभाल करत होती. ही मुलगी दुसरीत शिकते. तिची आत्या तिला शाळेत सोडायला आणि परत आणायला जात होती. तसेच अभ्यास करावा म्हणून तिला मारहाण करत होती. मुलीच्या अभ्यासासाठीच आत्या तिला मारहाण करते असे समजून आजीही काही बोलत नव्हती. मात्र, मुलीच्या हाताला झालेली जखम पाहून तिने मुलीला रुग्णालयात दाखल केले असता घडलेल्या घटनेने तिला धक्काच बसला.

तिची बोटे काळीनिळी पडली होती आणि ती कोणतीही वस्तू पकडू शकत नव्हती असे डॉक्टरांनी संगितले. मुलीविरोधात तक्रार दाखल करण्याची आजीची इच्छा नव्हती. मात्र, बाल अत्याचाराचे प्रकरण असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.