धक्कादायक ! नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी पुण्यातील तरूण बनला ‘चोर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माणसाकडे पैसा नसले तर माणसाला काय करू काही नाही हे सुचत नाही, तो काहीही करू शकतो. असच काही पुण्यात घडेलं आहे. नोकरी असताना घरात सर्व व्यवस्थित सुरू होतं. मात्र नोकरी गेल्यानं घरखर्च भागवण्यासाठी त्यानं चोरीचा पर्याय स्वीकारला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क या भागात मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने याचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता मोबाईल चोर हुसेन बद्दल माहिती पोलिसांना मिळाली.

हुसेन शेख (नागपूर चाळ, येरवडा) असं संशयित आरोपीचे नाव आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस घरी गेले असता तो त्याच्या बायकोच्या घरी औरंगाबाद येथे राहतो तर कधी नगर येथील त्याच्या मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली. हुसेन चोरी करणार असल्याची टीप पोलीस नाईक स्वप्नील कांबळे यांना मिळाली. त्यामुळे पोलीसांनी त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने हुसेनला दोन मोबाइलसह ताब्यात घेतले.

अचानक नोकरी गेल्यामुळे हुसेनला घर चालवणे अवघड जात होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी मोबाइल चोरण्याचा मार्ग त्याने स्वीकारला. त्याने आतापर्य़ंत अनेक मोबाइल चोरले असून अनेक मोबाइल त्याने आपल्या बायकोकडे ठेवले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.