‘ते’ दुकान आमदार अरुण जगतापांचे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – स्टेशन रस्त्यावरील राजासहाब वाईन्सचे गोडाऊन पडून सुमारे 12 लाख रुपयांची मद्यसाठा चोरून घेण्यात आला आहे. हे वाईनचे दुकान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्टेशन रस्त्यावरील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर राजासहाब वाईन्स नावाचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूस मद्यसाठा ठेवण्यासाठी गोडावून आहे. रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोडावूनचा पाठीमागील दरवाजा तोडून आतील 12 लाख रुपयांची वाईन, बिअर, दारु चोरून नेली. आज सकाळी घटनेचा उलगडा होतात. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोडाऊनची पाहणी केली. पंधरा ते वीस लाख रुपयांचे वाईन व विना कंपन्यांच्या दारूचे बॉक्स चोरीस गेल्याचे दुकान मालकाकडून सांगितले जात होते. वाइनच्या साठ्याची तपासणी केली असता 12 लाख रुपयांची वाइन चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील रहदारीच्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरील दारू चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. सदर दुकान आमदार अरुण जगताप यांच्या नावे आहे.