सापाच्या बचावासाठी सर्पमित्र सरसावला, कोब्रा त्याच्या अंगावरच चवताळला (व्हिडिओ)

वृत्तसंस्था :  सापाच्या बचावासाठी सर्पमित्र सरसावला मात्र,  त्यास पकडण्याच्या प्रयत्नात असतााना सर्पमित्राचा तोल गेल्यामुळे सापाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सर्पमित्र व त्याच्या सोबत असणाऱ्या सहकार्यांच्या तत्तपर्यतेमुळे सर्पमित्र कोब्रा या विषारी सापापासून पासून थोडक्यात बचावला आहे. ही घटना कर्नाटक मधील शिवमोग्गा परिसरात घडली आहे. दरम्यान या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये सर्पमित्र व त्याच्या एक सहकारी कोब्रा या विषारी सापास पकण्यास येतात यावेळी या सापास पकडताना सर्पमित्राचा व त्याच्या सहकाऱ्याचा सुध्दा तोल जातो दरम्यान कोब्रा सर्पमित्रावर हल्ला करण्यार तेवढ्यात सर्पमित्र त्यास पकडतो व आपली सुटका करुन घेता.