Video : ‘हे’ गाणं असेल वर्ल्डकप २०१९ चं थीमसॉंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने या वर्षीच्या क्रिकेट विश्वकपाचे थीम सॉंग काल रिलीज केले. मैदानात होणाऱ्या सर्व सामन्यात तसेच मैदानाबाहेर होणाऱ्या विश्वकपाशी संबंधित सर्व कार्यक्रमात हे सॉंग वाजवले जाणार आहे. ‘स्टॅन्ड बाय’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे लोरिन आणि इंग्लंडचे सर्वात प्रसिद्ध बँड ‘रूडिमेंटल’ यांनी तयार केले आहे.
दरम्यान, ३० मे ते १६ जुलै या दरम्यान या स्पर्धेचे सामने इंग्लंडमधील ११ मैदानांवर रंगणार आहेत. एकूण ४६ सामने यादरम्यान खेळले जाणार आहेत.

भारतीय संघाचे सामने पुढीलप्रमाणे:

१) भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका, साउथेम्प्टन – ५ जून

२)भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओवल – ९ जून

३) भारत विरुद्ध न्यूजीलैंड, ट्रेंट ब्रिज – १३ जून

४) भारत विरुद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रैफर्ड – १६ जून

५) भारत विरुद्धअफगानिस्तान, साउथेम्प्टन – २२ जून

६) भारत विरुद्ध वेस्टइंडीज, ओल्ड ट्रैफर्ड – २७ जून

७) भारत विरुद्ध इंग्लैंड, एजबेस्टन – ३० जून

८) भारत विरुद्ध बांग्लादेश, एजबेस्टन – २ जुलै

९)भारत विरुद्ध श्रीलंका, लीड्स – ६ जुलै