दुर्देवी ! संपुर्ण गावानं घेतली बघ्याची भूमिका, मुलांनी वडिलांचं पार्थिव नेलं चक्क सायकलवरून

पोलिसनामा ऑनलाईन – गावकर्‍यांनी अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यत घडली आहे.

कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावातील 70 वर्षीय व्यक्तीची प्रकृती बिघडली होती. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते पण वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे या वृद्धावर कोणतेही उपचार झाली नाही, अखेर राहत्या घरात या वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण त्या व्यक्तीच्या निधनानंतर गावकर्‍यांनी कोरोनाच्या भितीने आणि अफवेमुळे अंत्यसंस्काराला येण्यास नकार दिला. अगदी नातेवाईकांनीही अंत्ययात्रेत भाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे शववाहिका आणि इतर वाहन मिळवण्यासाठी मुलाने प्रयत्न केला. पण, वेळेवर तेही मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या मुलांनी मृतदेह सायकलवरून नेला आणि जन्म दात्याबापावर अंत्यसंस्कार केले. यावेळी घरच्या व्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणीही उपस्थित नव्हते. गावातून मुले जन्मदात्या बापाला सायकलीवर स्मशानभूमीत घेऊन गेले पण कुणीही समोर आले नाही.