‘बेबो करीना’ला लाडक्या तैमूरला द्यायचीय ‘ही’ खास गोष्ट, पैसै देऊनही विकत मिळणार नाही

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर सोशल मीडियावर आपल्या क्युटनेसमुळं नेहमीच गाजत असतो. एका मुलाखतीत करीना कपूरला प्रश्न विचारण्यात आला की, अशी कोणती गोष्ट आहे जी पैशानं विकत घेतली जाऊ शकत नाही आणि ती तिला तैमूरला द्यायची आहे. यावर करीना खूप सुंदर उत्तर दिलं होतं.

करीनानं सांगितलं की, ती तैमूरला त्याच्या दिवगंत दादा आणि नानांना भेटवेल. जर कसंही करून हे जर शक्य झालं तर तर ती त्याचे आजोबा दिवंगत मंसूर अली खान आणि आणि दुसरे दिवंगत आजोबा राज कपूर यांना भेटवेल. करीनानं दिलेलं हे सुंदर उत्तर चाहत्यांसह साऱ्यांनाच आवडलं होतं. करीनाचा लाडका तैमूर नेहमीच या ना त्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असतो.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सारेच थिएटर 31 मार्च 2020 पर्यंत बंद आहेत. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like