धक्कादायक ! ST कंडक्टर महिलेनं आपल्या मुलासह केली आत्महत्या

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका एसटी वाहक असलेल्या महिलेनं आपल्या तरुण मुलासोबत रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन आत्महत्या केली हि घटना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

अंजली भुसनळे, उत्कर्ष भुसनळे अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.आज सकाळी लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ दोघांनी धावत्या इंजिन समोर उडी घेऊन आत्महत्या केली.अंजली भुसनळे या येवला बस आगारात वाहक म्हणून काम करत होत्या.सकाळी अंजली ह्या आपल्या मुलाला घेऊन लासलगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या आणि त्यांनी समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वे इंजिनखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. अंजली आणि त्यांच्या मुलाने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.