पुन्हा एकदा शेअर बाजाराने खाल्ली आपटी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन 

मार्केट उघडताच डॉलरच्या तुलनेत आजही विक्रमी घसरण झाली आहे. रुपयाच्या तुलनेत एका डॉलरची किंमत ७३.६० रुपये झाली आहे. इतकेच नव्हे तर  सेन्सेक्समध्येही  ७५७ अंकांनी घसरण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे  शेअर बाजारातही गोंधळ उडाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ea17280-c79a-11e8-b1a4-a5167eab4d97′]

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने रुपयाची घसरण होत आहे.  याआधी बुधवारी एका डॉलरची किंमत ७३.३ रुपये झाली होती. सोमवारी ४३ पैशांनी रुपया घसरला होता. सोमवारी एका डॉलरची किंमत ७२.९१ एवढी होती.  इतकेच नव्हे तर  एमर्जिंग इकॉनॉमिजसमोर निर्माण  झालेल्या  समस्यांचाही रुपयावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या ‘या’ ५१ शाखा बंद होणार

दरम्यान  बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये ७५७ अंकांनी घसरण झाली. आज सकाळी बीएसई सेन्सेक्स ४७० अंकावर होता. त्यात १.३० टक्क्यांनी घसरण होऊन ३५,५२१.७३ वर आला. तर निफ्टी निर्देशांकातही १५० अंकांची घसरण झाली. सकाळी १०,७५४ अंकावरून निफ्टीची सुरुवात झाली होती.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89c41558-c79a-11e8-b267-ad07dfb46ef5′]