भोकर: समतानगर बनले गुटख्याचा गड

भोकर: पोलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

भोकर शहरात अनेक दिवसांपासून समतानगर भागात राहणार तरुण व्यापारी गुटखा सर्वच प्रकारचा खुलेआम भोकर शहरात पार्सल करतोय अशी चर्चा सर्व शहरातून होत आहे. पण आज पर्यंत भोकर शहरात कधीच मोठी कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त यांनी केले नाही त्याच बरोबर भोकर शहराला जो अधिकारी गुटखा बंदीसाठी दिला आहे तो अधिकारी त्या गुटखा व्यापाऱ्यां कडून चिरीमिरी करून या व्यापाऱ्याला छुपा पाठिंबा देत आहे की अशी चर्चा भोकरच्या नागरिकांमध्ये होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66c005a1-c22c-11e8-8eaf-ebbf5b1d4b78′]

या अगोदर देखील छोटी मोठी कार्यवाही करून या धंदयाला अजून जास्तीचे बळ अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी देत असल्याचे दिसून येत आहे.

गुटख्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक देखील वेसनाकडे जाताना दिसून येत आहेत. पानपट्टीवर  शासनाने बंदी घालून दिलेला गुटखा मिळतात त्यामध्ये सीतार,गोवा, पेट्रोल,आर के,वजीर,मोठा सीतार,आदत,स्टाईल या  प्रकारच्या गुटख्याची भोकर शहरात अमाप विक्री चालू आहे. शासनाने बंदी घालून दिली पण कुठल्याही प्रकारे भोकर शहरात व तालुक्यात सरास माल पुरवणे चालू आहे. या अगोदर दोन छोट्या कार्यवाही केली गेली. परंतु आता मात्र त्या व्यापाऱ्यांची भीती मेली आहे.  भोकर शहरातील व्यापाऱ्याला कोण माल पुरवितो हे देखील अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना माहीत असून यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नाही त्यामुळे विद्यार्थी वेसनाकडे जात आहे व त्याचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. अवैध गुटख्यावर कधी पावबंद अधिकारी करतील याकडे सर्व भोकर वासीयांचे लक्ष वेधून आहे.

[amazon_link asins=’B07DNS3KCB,B014CLL3KS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f3edead-c235-11e8-9d1d-27c7684ace16′]