करमाळ्यातील अट्टल चोरट्यास सांगलीत अटक

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात चो-या, घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगाराला सांगली पोलिसांच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. इंतकाल फुलझेंड्या काळे (वय-२६) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. काळे याला  करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितेल.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी संशयितांची शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक पिंगळे यांच्या पथकाने वाळवा तालुक्यातील भवानीनगर, ताकारी, वाळवा, किल्लेमच्छिंद्रगड, काळमवाडी परिसरात सोमवारी कोम्बींग ऑपरेशन केले. त्यावेळी ओळख लपवून राहिलेल्या इंतकाल काळेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने करमाळा परिसरात चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याला करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.