दगडाने ठेचून सात वर्षाच्या चिमुरड्याचा खून, मृतदेह फेकला जंगलात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अंबरनाथमध्ये अवघ्या सात वर्षाच्या चिमुरड्याची अमानुषपणे हत्या करुन मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समजू शकले नाही. तसेच ही हत्या कोणी केली हे देखील अद्याप समजू शकले नाही. मात्र, या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात शोककळा पसरली आहे.

ही घटना अंबरनाथच्या डोंगराळ भागात घडली असून, शिवम दिग्विजय रजक असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. शिवम याचा मृतदेह गुरुवारी (दि.२) सकाळी बुवापाडा खदानमध्ये सापडला.

[amazon_link asins=’B07B8KLM3H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39669325-964a-11e8-a001-9f6dcd299493′]
शिवम बराच वेळ घरी न दिसल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शक्य तेवढ्या ठिकाणी शोध घेतल्या नंतरही या चिमुरड्याचा शोध लागला नाहीं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील शिवमचा संगळ्या ठिकाणी शोध घेतला. यादरम्यान, बुवापाडा खदानमध्ये एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेहाची ओळख शिवमच्या घरच्यांकडून करण्यात आली. त्यावेळी हा मृतदेह शिवमचाच असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. अंबरनाथ पोलिसांनी शिवमचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

या खूनामागचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलिसांनी कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आहे, त्यानुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.