‘लॉकडाऊन’मध्ये सायकलवरून वडिलांना घरी नेणाऱ्या ज्योतीच्या आयुष्यावर चित्रपट येणार !

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये हरियाणातील गुरुग्रामधील ज्योती हिनं आपल्या वडिलांना चक्क सायकलवरून घरी नेलं. आता अशी माहिती आहे की, ज्योतीच्या आयुष्यावर लकवरच चित्रपट तयार केला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फिल्म निर्माता , सह दिग्दर्शक विनोद कापडी यांनी ज्योती आणि तिचे वडिल मोहन पासवान यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला आहे.

ज्योती आणि तिचे वडिल मोहन पासवान यांनी भागीरथी फिल्म प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार केल्याचंही समजत आहे. त्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. रकमेबद्दल बोलायचं झालं तर अद्याप याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही.

विनोदी कापडी म्हणाले, “हा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. यावर लवकरच माहितीपट येणार आहे. ज्योती कहाणी वेगळ्या पद्धतीनं दाखवायची आहे. कारण हा मुलगी आणि वडिलांचा संघर्ष आहे.”

‘ही अत्यंत आनंदाची बाब’- मोहन पासवान

ज्योतीचे वडिल मोहन पासवान म्हणाले, “ज्योतीवर सिनेमा तयार केला जाणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला माझ्या मुलीचा गर्व आहे. मुलगा आणि मुलीसोबत कधीच फरक करू नका. आज माझ्या मुलीमुळंच माझं नाव झालं आहे.”