पिसाळलेल्या कुत्र्यानं केलं 2 सुरक्षा रक्षकांना गंभीर जखमी

थेऊर : येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे आवारात पिसाळलेल्या कुत्र्याने दोन सुरक्षा रक्षकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले असून या कुत्र्याने गावात दहशत निर्माण केली आहे.

यशवंत सहकारी साखर कारखाना गेली दहा वर्षापासून बंद अवस्थेत असून तो चालू होण्याची चिन्हे दिसत नाहीत कारखान्यावर सध्या राज्य सहकारी बॅकेचा ताबा असून तो अवसायनात काढण्यात आला आहे त्यामुळे येथे केवळ मोजक्या सुरक्षा रक्षकावर सुरक्षेची जबाबदारी आहे कारखान्याच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे तसेच अनेक गुरे चरत असतात.सगळीकडे मोठे गवत वाढलेले आहे काल सायंकाळी सुरक्षा रक्षक परिसरात गस्त घालत असताना एक पिसाळलेल्या कुत्र्याने एकदम अंगावर झेप घेतली काही समजण्याच्या आत तोंडाला मोठी जखम झाली तर आणखी एका रक्षकाच्या कोपराचा चावा घेतला.यावर या जखमी सुरक्षा रक्षकांना प्राथमिक उपचार करुन ससून रुग्णालयात नेले होते रात्री उशिरा त्याना घरी सोडण्यात आल्याचे समजते