आता ‘फिंगरप्रिंट’ शिवाय चालू नाही होणार तुमची कार, चोरी रोखण्यासाठी विद्यार्थ्याने बनवलं अनोखं ‘डिव्हाइस’

आगर : म्हणतात की, काही करून दाखवण्याची इच्छा असेल तर तुम्ही मोठ्यात मोठे काम सुद्धा करू शकता आणि यामध्ये वयसुद्धा महत्वाचे नसते. असेच काहीसे नवीन करून दाखवले आहे आगर मालवा जिल्ह्यातील एका तरूण विद्यार्थ्याने आगरमध्ये राहणार्‍या अवघ्या 16 वर्षाच्या तरूणाने कार चोरी होऊ नये यासाठी कारमध्ये एक असा डिव्हाइस (unique device)  बनवून लावला आहे, ज्यामुळे कुणीही अन्य व्यक्ती कार स्टार्ट करू शकणार नाही. केवळ ज्या लोकांचे फिंगर सेव्ह असतील तेच कार सुरू करू शकतात.

आगरा मालवा जिल्ह्यात 10 वी पास करून पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स शिकत असलेला विद्यार्थी विनय जयस्वाल अँड्रॉइड फोन वापरताना विचार करत असे की, फोन फिंगरप्रिंटने चालतो तर गाडी का नाही. हेच लक्षात ठेवून विनय जयस्वालने केवळ 3 हजार रूपये खर्च करून डिव्हाइस तयार केला, ज्याचा वापर पहिल्यांदा बाईकवर केला. जेव्हा प्रयोग यशस्वी झाला तेव्हा विनयने त्याचे वडील अरूण जयस्वाल यांच्या कारमध्ये हा डिव्हाइस लावला. कार स्टार्ट करण्यासाठी चावी लावण्यासह डिव्हाइसवर फिंगर ठेवावे लागते, बोट ठेवताच कार स्टार्ट होते. ज्यांचे फिंगर सेव्ह नसेल त्यांच्याकडून कार सुरू होऊ शकत नाही.

परिसरात सतत होणार्‍या वाहनचोरीच्या घटना ऐकून विनय विचार करत असे की, अखेर या घटना रोखण्यासाठी काय करावे. नंतर त्याने इंटरनेटच्या माध्यमातून विविध वस्तू जोडून सुमारे एक महिन्यानंतर हा डिव्हाइस बनवला. अशाप्रकारचे डिव्हाइस सध्या असले तरी ते बनवण्यासाठी खुप खर्च येतो, आणि ते खुपच महागड्या गाड्यांमध्ये असतात. पण विनयने ते खुप कमी खर्चात बनवले आहे. यासाठी त्याच्या शाळेतील अटल टिंकिंग लॅबची खुप मदत झाली. विनय हे डिव्हाइस आणखी मॉडिफाय करून यामध्ये जीपीएससुद्धा लावण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय त्याचा प्रयत्न आहे की, जर कार कुणी तारेचा वापर करून स्पार्क करून स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला तर कार मालकाच्या मोबाइलवर मॅसेज जाईल. यासोबतच हा डिव्हाइस कारच्या दरवाजाला सुद्धा लावण्याचा विनयचा विचार आहे, ज्यामुळे कुणीही अनोळखी व्यक्ती कारचा दरवाजा उघडू शकणार नाही.

विनयचे वडील जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीचे सचिव आहेत आणि ते नेहमी आपल्या मुलाला प्रोत्साहन देतात. हा डिव्हाइस बनवण्यापूर्वी कोरोना काळात विनयने सामान पोहचवण्यासाठी ड्रोन, ऑटोमेटिक सॅनिटाइज मशीन आणि ऑटोमॅटिक डस्टबिन सुद्धा बनवले आहे.