ज्ञान प्रसारक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर नाही

पोलीसनामा ऑनलाईन

पुणे – आंबेगाव येथील अमर एज्युकेशन सोसायटीचे ज्ञान प्रसारक विद्या मंदिरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळा सुरु होताच संचालक मंडळाने पुर्वीच्या शाळेच्या जागेवरुन दुसरीकडे एका अपार्टमेंट मधे अचानक मुख्यध्यापिका, शिक्षक व पालकांना कोणतीही पुर्व कल्पना न देता स्थलांतर केले. याच घटनेवरुन शाळेतील शिक्षक व पालक यांनी संचालक मंडळाला धारेवर धरत दोन दिवस आंदोलन करुन पोलिसांकडे धाव घेतली. तर शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित पाहून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शाळेच्या पालकांनी सामाजिक कार्य करणाऱ्या दिव्य फांऊडेशनच्या अध्यक्षा सारीका अगज्ञान यांना हकीकत सांगितली. त्यानंतर अगज्ञान यांनी मध्यस्थी करुन पोलिस तसेच पालक-शिक्षक व स्थानिक सभासद युवराज बेलदरे यांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक ठरवली. या बैठकीत संचालक अरुण व मंगल साकोंडे यांच्याशी पोलिस व शिक्षण अधिकारी तसेच अगज्ञान यांची सकारात्मक चर्चा होऊन यावर्षी शाळा पुर्वीच्या आहे त्याच ठिकाणी भरेल व पुढील शैक्षणिक वर्षी शिक्षक-पालक यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असे सांगितले.

अशा प्रकारे सदर बैठकी वेळी पालकांच्या लढ्याला व शिक्षकांनी दिलेल्या पांठिब्याला यश आले. यामध्ये सहा.शिक्षण प्रमुख म.न.पा श्रीमती आवारे, बोखरे व श्री.शेंडकर, पर्यवेक्षिका उषा काळे, सचिव मंगल सोकांडे व अध्यक्ष अरुण सोकांडे (ज्ञान प्रसारक विद्यामंदिर), भारती कुंभार(प्र.मुख्यध्यापिका), शिक्षक वृंद,  काळे (पोलिस निरिक्षक), सारीका अगज्ञान(अध्यक्षा, दिव्य फांऊडेशन), हिरालील अगज्ञान (राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल संघटन मंत्री, पुणे जिल्हा) व सर्व पालक वर्ग यांचा सहभाग होता.