मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करणार

मुंबई : पोलीसनामा

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्ण फी भरून प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना त्यातील निम्मी रक्कम परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. महसूलमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री राम शिंदे उपस्थित होते.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f85f8823-ab4a-11e8-99e4-33a207ac0ba9′]

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून दररोज आंदोलने होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील युवकदेखील आक्रमक झाले आहेत. त्यातच काही आंदोलकांनी आत्महत्या केल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुख्यमंत्रीदेखील अडचणीत आले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा मानस काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील आठ लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांना ६०५ अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय आधीच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालये आणि संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानंतर महाविद्यालयांनी निम्मे शुल्क भरून प्रवेश दिले आहेत. तरीही ज्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शुल्क भरून प्रवेश दिले गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांना देण्यात येणारी उर्वरित रक्कम महाडीबीटीमार्फत वितरीत करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेमधील पदे तातडीने भरण्यात यावीत. सारथीचे विविध अभ्यासक्रम तातडीने सुरू करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, १ हजार कोटींची कामे करणार