सूर्य ‘लॉकडाऊन’मध्ये गेल्याने शास्त्रज्ञांचा ‘इशारा’, ‘भूकंप’, ‘दुष्काळ’ आणि ‘थंडी’चा करावा लागू शकतो ‘सामना’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केवळ आपणच नव्हे, तर सूर्यदेखील लॉकडाऊन कालावधीत गेला आहे. आपला लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखून जीव वाचवण्यासाठी आहे. तर सूर्याच्या लॉकडाऊनमुळे थंडी, भूकंप आणि दुष्काळाचे कारण बनू शकतो.

सूर्यसुद्धा लॉकडॉऊनच्या स्थितीत

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार सध्या सूर्य हा सौर मिनिमम स्थितीत आहे. याचा अर्थ सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचाली खुपच कमी झाल्या आहेत. उन्हाच्या कमतरतेच्या सर्वात मोठ्या काळाच्या आपण खुपच जवळ आलो आहोत. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर सूर्यावरील काळे डाग जवळपास नाहीसे झाले आहेत. सूर्य लॉकडाऊनमध्ये गेल्याने 1790 आणि 1830 च्या दरम्यान संकटांचा काळ होता. त्याकाळास डॉल्टन मिनिमम असे नाव देण्यात आले होते. त्यावेळी खुप थंडी, दुष्काळ आणि शक्तिशाली ज्वालामूखीच्या घटना समोर आल्या होत्या. नासाच्या शास्त्रज्ञांना शंका आहे की, सध्यस्थितीत तो काळ पुन्हा येऊ शकतो. कारण 2020 मध्ये सूर्य सपाट झाला आहे.

जलवायु असंतुलन हे धोक्याचे तर लक्षण नाही ना!

द इन्डिपेंडन्टच्या वृत्तानुसार खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर टोनी फिलिप्स म्हणतात की, 20 वर्षात तापमानात सुमारे 2 डिग्री सेल्सियसने कमी झाले आहे. यादरम्यान जलवायु असंतुलनामुळे सरासरी जागतिक तापमानात 0.4-0.7 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. तसेच सूर्यावरील काळे डाग सुमारे 76 टक्क्यांनी कमी झाले आहेत. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र कमी झाले आहे. ज्याच्यामुळे मंडळात अतिरिक्त ब्रह्मांडीय किरणे येत आहेत. जास्त ब्रह्मांडीय किरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.