आश्चर्यजनक ! ‘इथं’ 22 पुरुषांनी दिला मुलांना जन्म

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियामध्ये सर्वांना चकित करणारी आकडेवारी समोर आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार मागील वर्षी तब्बल २२ पुरुषांनी या ठिकाणी मुलांना जन्म दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ ह्यूमन सर्विसने दिलेल्या या आकडेवारीनुसार मुलांना जन्म दिलेले हे सर्व पुरुष ट्रान्सजेंडर आहेत.

त्याचबरोबर मागील दहा वर्षांत अशाप्रकारे आतापर्यंत २२८ पुरुषांनी या पद्धतीने मुलांना जन्म दिला आहे. २००९ पासून यासंबंधी कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आली नव्हती. त्यानंतर थेट यावर्षी हि आकडेवारी समोर आली आहे. लैंगिक बदल केल्यानंतर या पुरुषांनी या मुलांना जन्म दिला आहे. अशा प्रकारे काही घटना सावर आल्यानंतर काहीजणांनी त्यांच्या पुरुषत्वावर शंका उपस्थित केली असून जो पुरुष मुलांना जन्म देऊ शकतो तो कधीही पुरुष असू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना मेलबर्न यूनिवर्सिटीच्या प्राध्यापकांनी म्हटले कि, पुरुषत्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. त्याचबरोबर प्रत्येक पुरुषाचे याविषयीचे विचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे ज्या पुरुषाने शस्रक्रिया करून मुलाला जन्म दिला तो त्या पद्धतीने विचार करत असणार. त्यामुळे प्रत्येकाला एकाच तराजूत तोलणे बरोबर नाही. त्यामुळेच त्याने या पद्धतीने मुलाला जन्म दिला असेल. दरम्यान, आता समाजाने आपले विचार बदलण्याचे वेळ आली असून नवीन गोष्टी स्वीकारण्याची देखील वृत्ती माणसांनी अंगिकारायला हवी.

आरोग्यविषयक वृत्त