काय सांगता ! होय, कुंडलीतील ‘मंगळ’ दूर करण्यासाठी शिक्षिकेने चक्क 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी केले लग्न

जालंधर : वृत्तसंस्था – कुंडीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी एका तरुण शिक्षिकेने अंधश्रध्देचा कळस गाठणारे कृत्य केले आहे. पंजाबमधील जालंधर या भागात हा प्रकार घडला आहे. शिक्षिकेने आपल्याकडे शिकवणीसाठी येणा-या 13 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रतिकात्मक लग्न केले. इतकेच नाही, तर सर्व विधी-सोपस्कार पार पाडून हातात असणारा हिरवा चुडा फोडत विधवा झाल्याचे ढोंग देखील केले. हा सारा प्रकार घडल्यानंतर शिक्षिकेने मुलाला घरी सोडले आणि मुलांने घरी आल्यानंतर घडलेली सर्व हकिकत पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बावा खेल परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेकडे त्यांचा 13 वर्षाचा मुलगा शिकवणीसाठी जात होता. शिक्षिकेच्या घरच्यांनी तिच्या कुडंलीतील दोष करण्यासाठी तिचे प्रतिकात्मक लग्न करायचे ठरवले. त्यावर शिक्षिकेने मुलाच्या पालकांना सांगितले की, मी याला माझ्या क्लासमध्ये शिकवते आणि तुम्ही मला पैसे देखील देऊ नका. त्याला माझ्याकडे काही दिवस राहू द्या. मुलाच्या घरातील लोकदेखील मान्य झाले. इकडे शिक्षिकेच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आणि लग्नही केले. लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर पती मेल्याचे ढोंग रचत हातातील चुडा फोडला.

त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. शिकवणीसाठी जाणा-या आपल्या मुलाला शिक्षिकेने घरात 6 दिवस कैद केले होते. त्या सहा दिवसांच्या दरम्यान लग्नाचे ढोंग करत, हळद- मेहंदीचे विधी देखील केले. एवढेच नाही तर सुहागरात्रीच्या नियोजनाचे नाटकदेखील केले. त्यानंतर शिक्षिकेने आपल्या हातातील चुडा फोडून विधवा होण्याचे नाटक रचले. दरम्यान भटजीने मुलीच्या कुंडलीतील मंगळ दोष करण्यासाठी हे सर्व नाटक केले होते. यामुळे तुमच्या मुलाला काहीही होणार नाही, असे सांगितल्याने हे प्रकरण मिटले.