मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त

हैदराबाद: वृत्तसंस्था

मुदतीपूर्वीच तेलंगणा विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे.  दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे तेलंगणात वेळेआधीच निवडणुका होण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7c029f1d-b1ba-11e8-81dd-7586ccdce8ce’]
तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ २ जून २०१९ पर्यंत आहे. मात्र त्यापूर्वीच सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणा विधानसभा सदस्यांची संख्या ११९ इतकी आहे. यामध्ये सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) ९०, काँग्रेस १३ आणि भाजपचे ५ आमदार आहेत.

दरम्यान, तेलंगणात सहा महिन्यांच्या आत विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २ जून २०१९ पर्यंत होता. त्यामुळे तिथे लोकसभा निवडणुकीवेळीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या. मात्र चंद्रशेखर राव यांनी त्यापूर्वीच म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसोबत तेलंगणाच्या निवडणुका व्हाव्यात अशी मागणी केली आहे. त्यासाठीच विद्यमान विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82c85362-b1ba-11e8-9b97-afe5c3085aa4′]

चंद्रशेखर राव हे गेल्या अनेक दिवसांपासून या निर्णयाची तयारी करत होते. नुकतंच मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्यभरात मोठी रॅली काढली होती. तसंच राज्यातील अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. रॅलींच्या निमित्ताने त्यांनी निवडणुकांची चाचपणी केली होती.

एल्गार परिषद : अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांच्या नजरकैदेत वाढ