थर्टी फर्स्टच्या मोक्या वरच मँगो गांजाचा मुख्य सप्लायर गजाआड; हायप्रोफाईल नशेबाज टेंशनमध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गांजा चरस हे तरुणाईचे आकर्षण ठरत आहे दिवसेंदिवस या नशिली पदार्थांकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात ओढल्या जात आहे.  मुंबई शहरातील मोठमोठ्या नशेबाजांना मँगो गांजा उपलब्ध करून देणारा मुख्य पुरवठादार अमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. त्यामुळे त्या पुरवठादारासाठी काम करणाऱ्या एजंटची भीतीने गाळण उडाली असून थर्टी फस्टच्या तयारीला लागलेल्या नशेबाजांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत.

तानाजी काते वय ३९ असे मँगो गांजाच्या मुख्य विक्रेत्याच नाव आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या तानाजीसाठी जवळपास 18 लोक काम करतात. ते लोक तानाजी कडे एजंट म्हणून काम करतात शहरातील नशेबाजांना मँगो गांजा देण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनीटने परळमध्ये राज ठाकूर रिक्षा चालकाला एक किलो 800 ग्रॅम वजनच्या मँगो गांजाची डिलेव्हरी देण्यासाठी आला असता पकडले होते.

तेव्हा मुख्य पुरवठादार तानाजी असून तो डोंबिवलीत राहतो, असे राजने पोलीस चौकशीत सांगितले होते. त्यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने तानाजीचे घर गाठले होते. परंतु कल्पना मिळाल्याने तानाजी पसार झाला होता. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावून पोलीस माघारी परतले होते. त्यानंतर घाबरलेला तानाजी वरळी युनीटमध्ये हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

आंध्रातून आणतो मँगो गांजा.

आंध्र प्रदेशमधून मँगो गांजा आणून तो मुंबई व आजूबाजूच्या शहरांत सप्लाय करतो, असे तानाजीने चौकशीत सांगितल्याचे पोलिसांकडून समजते. त्यामुळे तानाजी नेमका कोणाकडून गांजा घेतो. नक्षलग्रस्त भागातून तो आणतो का, तेथील त्याचे एजंट कोण, याचा पोलीस तपास करीत आहेत.

दम मारता मारता विकू लागला. 
घरे बांधून ती भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारा तानाजी आधी स्वतः गांजा ओढायचा. मग त्याला मँगो गांजाची माहिती मिळाली. मँगो गांजाची किंमत आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मग तानाजीने स्वतः मँगो गांजा विकण्यास सुरुवात केली. त्याने एजंटची चैन तयार केली आहे. पण आता म्होरक्याच गजाआड झाल्याने थर्टी फस्टला मँगो गांजा कसा मिळणार, अशा टेंशनमध्ये नशेबाज आले आहेत.