चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करुन केला ट्रक चालकाचा खुन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकची बॅटरी चोरत असताना प्रतिकार केल्याच्या कारणावरुन चार ते पाच चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार करुन ट्रकचालकाचा खुन केला. ही घटना पहाटे २:३० च्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राबाहेर घडली.

दत्तात्रय भोईटे (वय ३५, रा. सातारा) असे या ट्रकचालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय भोईटे हे ट्रक घेऊन जात होते. मध्यरात्री त्यांना झोप आल्याने त्यांनी सोलापूर रोडवरील मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ट्रक लावल. व ते झोपी गेले. त्यानंतर पहाटे अडीच च्या सुमारास चार ते पाच चोरटे त्यांची ट्रकची बॅटरी चोरत होते. त्यांनी एक बॅटरी काढली. दुसरी काढत असताना भोईटे यांना जाग आली. त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. त्यात त्यांच्यात झटापट झाली. तेव्हा त्यांच्यातील एकाने भोईटे यांच्या छातीत धारधार शस्त्राने वार केला. त्यामुळे ते त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेऊन पळत जाऊ लागले. काही अंतर गेल्यानंतर ते रस्त्यावरच कोसळले. ही घटना घडल्यानंतर चोरटे पळून गेले.

भोईटे हे रस्त्यावर उलटे पडले असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना हा अपघाताचा प्रकार असावा, असे वाटले. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले.

याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहिले तर भोईटे यांचा मृत्यु झाला होता. मृतदेहाची तपासणी केल्यावर हा अपघात नसून खुन असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नात्याला काळीमा फासणारी घटना : आजे सासऱ्याने केला नात सूनेचा विनयभंग