चोरीच्या वाहनांमधून येऊन घरफोडी करणाऱ्या सराईतासह अल्पवयीन जाळ्यात

२० गुन्ह्यांची उकल, १४ लाख १४ हजार रुपयांची वाहने जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहर व परिसरात वाहनचोऱ्या करून त्या वाहनांचा वापर घरफोडीसाठी करणाऱ्या एका सराईतासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला वानवडी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २० गुन्हे उघडकिस आणत १४ लाख १४ हजार रुपये किंमतीची ४ चारचाकी व १२ दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

अमरसिंग जगरसिंग टाक (२०, हडपसर, मुळ रायचूर कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कर्नाटकातील रायचूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. पवित्रसिंग उर्फ पैतर गब्बरसिंग टाक या त्यांच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.

वानवडी पोलिसांचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस शिपाई शिरीष गोसावी व पोलीस शिपाई नासीर देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका ग्रे रंगाच्या दुचाकीवरून दोनजण रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात आले आहेत. त्यांच्या दुचाकीला क्रमांक नाही. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी शोधून स्मशानभूमीजवळ सराईत टाकसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर टाक व अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडून २० गुन्हे उघडकिस आले. तर त्यांनी चोरी केलेल्या ४ चारचाकी व १२ दुचाकी जप्त केल्या. या वाहनांचा वापर करून त्यांनी लोणी काळभोर, बिबवेवाडी, कोंढवा, सहाकरनगर या परिसरातील सोसायट्यांमध्ये घरफोड्या केल्याचे ४ गुन्हे उघडकिस आले आहेत. तर त्यांनी वानवडी, कोंढवा, हडपसर, स्वारगेट, चंदननगर, शिवाजीनगर, वारजे , लोणी काळभोर, यवत येथून १६ दुचाकी व चारचाकी वाहने चोरली तर ४ घरफोड्या केल्या. या गुन्ह्यांतील एकूण १४ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर त्यांचा साथीदार पवित्रसिंग उर्फ पैतर गब्बरसिंग टाक यचा शोध सुरु आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रावसाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक पोलीस फौजदार रमेश भोसले, कर्मचारी राजू रासगे, निसार खान, ज्ञानेश्वर गिरमकर, सुदर्शन बोरावके, सुधीर सोनवणे, योगेश गायकवाड, प्रतिक लोहीगुडे, नवनाथ खताळ, महेश कांबळे, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने केली.