चोरट्यांनी फोडलं शहर महिला पोलीस कर्मचाऱ्याचं ‘घर’, रोकड ‘लंपास’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सुरत-नागपुर बायपास जवळील महिला पोलीस कर्मचाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी 40000 रुपये रोख रक्कम लंपास केली. बायपास जवळील जलगंगा कॉलनीतील ही घटना आहे. चोरी झालेली रक्कम महिला पोलीस कर्माचाऱ्यानं आपल्या पतीच्या उपचारासाठी ठेवली होती. पोलीसांच्या राहत्या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जलगंगा कॉलनीत पोलीस कर्मचाऱ्याच्या घरांची संख्या जास्त आहे. सुरत-नागपुर बायपास जवळील जलगंगा सोसायटीत मातोश्री नावाचं दुमजली घर आहे. 103 असा मातोश्रीचा घर नंबर आहे. संगिता देसले असं चोरी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. देसले पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. घर बंद होतं. घरात पतीच्या उपचारासाठी ठेवलेले 40 हजार रुपये होते. चोरट्यांनी बंद घराच्या लोखंडी दाराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये लंपास केले अशी माहिती आहे.

याबाबत शहर पोलिसांत विचारणा केली असता ठाणे अंमलदार कल्पना खांडिकर यांनी या चोरीची नोंद नसल्याचं सांगत माहिती देण्यास नकार दिला.

धुळे शहर हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, मनपा शाळेतील 30 ते 35 हजारांचे शालेय साहित्य लंपास

दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत चोरट्यांनी धुळे शहरातील मनपा शाळेतील शालेय साहित्यावर डल्ला मारला. आज (शुक्रवार दि 15 नोव्हेंबर) शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांत माहिती दिली आहे. मुख्याध्यापकांनी याबाबत महिला ठाणे अंमलदारांकडे लेखी अर्ज दिला. शहरातील शनी नगरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोरच मनपा शाळा क्र 15 आहे. याच शाळेत चोरट्यांनी हात मारला.

प्रसार माध्यमांना माहिती देताना मुख्याध्यापक शरद पवार यांनी सांगितले की, आत्तापर्यंत शेकडो वेळा शाळेतील बंद खोलीतून संगणक, तांदुळ पोती, खेळणी, नकाशे असे साहित्य चोरीला गेले आहे. शालेय साहित्य चोरीबाबत मनपा आयुक्त व पोलीसांत अर्ज दिले आहेत. परंतु चोरटे अद्याप अटक झालेले नाहीत.”

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने शाळेची खोली बंद होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी लाकडी दाराचे कुलूप तोडून शाळेत प्रवेश केला. चोरट्यांनी सीपीयु, शाळेची रद्दी, पेपरचे गठ्ठे असा अंदाजे 30 ते 35 हजारांचे शालेय साहित्य अज्ञात चोरांनी लंपास केले. याबाबत लेखी तक्रार दिली आहे.” असंही मुख्याध्यापक शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like