अखेरच्या श्वासपर्यंत आपल्या मताशी ठाम राहणारा ‘विचारवंत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी, हिंदी चित्रपट, नाटके यामध्ये विविधअंगी भूमिका साकारणारे नटसम्राट श्रीराम लागू हे अभिनयाबरोबर एक वैचारिक भूमिका घेऊन आयुष्यभर जगले. समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनातही त्यांचा मोठा वाटा होता. समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी थेट देवाला रिटायर केले पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी लागु यांनी सामाजिक कृतज्ञता निधी ही संकल्पना राबविली. सामाजिक कृतज्ञता निधी या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. बुद्धीप्रामाणवादी भूमिका घेऊन ते आयुष्यभर जीवन जगले.

अभियनात वेगळ्या भूमिका श्रीराम लागू यांनी अजरामर केल्या असल्या तरी जीवनात त्यांनी नेहमीच नास्तिकाची ठाम भूमिका त्यांनी पार पडली. देवा रिटायर करायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात असलेल्यांसह असंख्य लोक त्यांच्यावर तुटून पडले, पण तरीही ते डगमगले नाहीत.

आपल्या या भूमिकेला अनुसरुनच त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी ही संकल्पना राबविली. या निधीतून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली जाते. ती अजूनही सुरु आहे. हा निधी उभारण्यासाठी अन्य कलावंतांची साथ घेऊन त्यांनी लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग राज्यभर केले. त्यातून मिळालेल्या पैशातून हा निधी उभारण्यात आला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीला त्यांनी कायमच साथ दिली. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना ते नेहमी मार्गदर्शन करीत असत. वस्तूनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची सवय कार्यकर्त्यांना लागावी, यासाठी ते कार्यकर्त्यांशी सतत संवाद करायचे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यक्रमाला ते आवर्जुन उपस्थित रहात होते.

आपल्या लमाण या आत्मचरित्रातून त्यांनी आपली ही बुद्धीप्रामाणवादी भूमिका सविस्तर मांडली आहे.
सामाजिक, राजकीय विषयांपासून हटकून बाजूला राहून त्यावर मत व्यक्त करण्यास ऐरवी कलावंत, साहित्यिक स्वत:ला दूर ठेवतात. असे असताना श्रीराम लागू यांनी मात्र महत्वाच्या प्रश्नांवर आपली मते जाहीरपणे व्यक्त केली. आणीबाणीला विरोध करण्याची त्यांनी भूमिका घेतली होती. नाटक, चित्रपटांवर जेव्हा जेव्हा सॅन्सारव्यतिरिक्त कोणी बहिस्काराची भाषा करीत, तेव्हा त्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता.

आपल्या भूमिकेवर ठाम असलेला हा विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. श्रीराम लागू यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यांचा मुलगा आनंद हा अमेरिकेहून आपल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/