गेल्या दहा दिवसात ‘स्वाईन फ्ल्यू’ चा तिसरा बळी

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन

शहरामध्ये स्वाईन फ्ल्युने आणखी एकाचा बळी घेतला आहे. गेल्या दहा दिवसात तीन जणांचा बळी शहरात स्वाईन फ्ल्यू ने घेतला आहे. आता परत स्वाईन फ्ल्यू ने डोके वर काढले असून पुण्यातील गोखले नगर येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शहरात या वर्षातील स्वाईन फ्लूने चार बळी घेतले आहेत.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ce1aea6-a79b-11e8-bfcb-072ed7a0f071′]

पिंपरी चिंचवड मधील स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढतच चालली आहे. ६० वर्षीय वृद्ध महिलेचा खाजगी रुग्णालयात २० ऑगस्ट पासून उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले मात्र त्यांचा दिनांक २४ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत ६१ जणांचा स्वाईन फ्ल्यू ने बळी घेतला होता. सद्य स्थितीला ऐकून ९ जण स्वाइन फ्ल्यू ने बाधित रुग्ण आढळले आहेत.  त्याच्यावर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9286d77c-a79b-11e8-8330-73e5a9a413bd’]

सर्दी, खोकला, ताप हे लक्षण आढळल्यानंतर लवकरात लकवर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यू च्या गोळ्या घ्याव्यात, सोबतच प्रतिबंधक लस घ्यावी. असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.