‘जैश ए मोहम्मद’कडून समुद्रामार्गे हल्ला करण्याचे दहशतवाद्यांना प्रशिक्षण : नौदल प्रमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जैश ए मोहम्मदकडून पाण्याखाली राहून दहशतवादी कारवाया करणाऱ्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठीचे प्रशिक्षणही सुरू असून त्यांना समुद्रामार्ग भारतात हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे माहिती नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनी आज पुण्यात सांगितले.

दक्षिण मुख्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमामने जनरल बी.सी. जोशी स्मृती व्याख्यानाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत ‘इंडो पॅसिफिक चेंजिंग डायनॅमिक्स मेरिटाईम सिक्युरिटी इम्पेरेटिव्हस फॉर इंडिया’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नौदलप्रमुख बोलत होते.

यावेळी बोलताना नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग म्हणाले, भारतात सहा दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्याबाबत नौदल विभागाकडून खबरदारी घेण्यात आहे. मुंबई येथे 26/11 च्या हल्ल्यानंतर कोस्ट गार्ड व इतर सुरक्षा वाढवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय खरे यावेळी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –