गुल मकई ट्रेलर : पडद्यावर पहिल्यांदाच तालिबानी अत्याचाराच्या विरूध्द लढणार्‍या ‘मलाला’च्या संघर्षाची कहाणी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाई हिचा बायोपिक गुल मकईचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातून बाहेर पडत शिक्षण घेण्यासाठी जनमानसात जनजागृती करणाऱ्या मलाला हिच्या बायोपिकच्या ट्रेलरवर प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन आजम खान यांनी केले आहे तर सिनेमात अतुल कुलकर्णी आणि दिव्या दत्ता सिनेमात मलालाच्या आई वडीलांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मलालाच्या मुख्य भूमिकेत रीम शेख दिसेल.

हा सिनेमा तालिबानच्या भीती आणि छळाच्या विरधात नोबेल पुरस्कार विजेत्या मलालाच्या विजयावर आधारीत आहे. या अडीच मिनिटाच्या ट्रेलरची सुरुवात खोऱ्यातील सुंदरतेपासून होते आणि डॉयलॉग आहे की पश्तूनने कधीही कोणत्याही मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला नाही. यात तालिबानकडून लोकांचा होणार छळ दाखवण्यात आला आहे. तर मलालाच्या जीवनाची कथा सांगण्यात आली आहे की कसे तिचे जीवन बदलते आणि कसे मलाला मोफत शिक्षणाच्या समर्थनात आपले मत मांडते.

मलाला कशा प्रकारे तालिबानच्या विरोधात उभी राहते हे या सिनेमातून दिसेल. ती या ट्रेलरमध्ये एक भाषण देताना दिसत आहे ज्यात ती म्हणते की तालिबनची ताकद त्यांचे हत्त्यार आहे तर आल्याकडे आपले कलम आहे. एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक पेन जग बदलून टाकू शकते. या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी आणि मुकेश ऋषि हे कलाकार देखील पाहायला मिळतील. सिनेमा 31 जानेवारीला प्रदर्शित होईल.

बॉक्स ऑफिसवर मलालाच्या बायोपिकच्या स्पर्धेत सेफ आणि हिमेशच्या सिनेमा –
याच दिवशी सैफ अली खानचा सिनेमा जवानी जानेमन प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर देखील नुकताच प्रदर्शित झाला. याशिवाय हिमेश रेशमियाचा हॅप्पी हार्डी आणि हीर हा सिनेमा 31 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like