लाखो लोकांना मोठा झटका ! रेल्वेनं बंद केल्या ‘या’ 14 ट्रेन, फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छठ पूजा आणि दिवाळीनंतर रेल्वे प्रवाशांना थोडा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रेल्वेने तब्बल 14 ट्रेन रद्द केल्या आहेत आणि 6 ट्रेन अर्धवट बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्या रुटची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात.

रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या गाड्या डेहराडूनच्या रेल्वे स्टेशनमध्ये यार्डच्या रिमॉडलिंगमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंद केलेल्या गाड्यांसाठी प्रवाशांना फेब्रुवारी 2020 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

कधी पर्यंत कोणती गाड्या असणार बंद? ही आहे पूर्ण यादी-

ट्रेन नंबर- 14631 डेहराडून अमृतसर एक्सप्रेस. 10 नोव्हेंबर ते 6 फेब्रुवारी 2020 पर्यंत.
अमृतसर डेहराडून एक्सेप्रेस- 9 नोव्हेंबर ते 6 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 14309. उज्जैन ते डेहराडून एक्सप्रेस. 13 नोव्हेंबर ते 6 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 14310. डेहराडून ते उज्जैन एक्सप्रेस. 12 नोव्हेंबर ते 5 फेब्रवारी
ट्रेन नबर- 14317. इंदौर ते डेहराडून एक्सप्रेस. 9 नोव्हेंबर ते 9 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 14318. डेहराडून ते इंदौर एक्सप्रेस. 9 नोव्हेंबर ते 8 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 14606. जम्मू हरिद्वार एक्सप्रेस. 10 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारी

ट्रेन नंबर- 14605. हरिद्वार ते जम्मू एक्सप्रेस. 10 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 19019. ब्रांदा ते डेहराडून एक्सप्रेस. 9 नोव्हेंबर ते 6 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 19020. डेहराडून ब्रांद्रा एक्सप्रेस. 10 नोव्हेंबर ते 9 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 54341. सहारनपूर ते डेहराडून पॅसेंजर. 11 नोव्हेंबर ते 8 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 54342. डेहराडून ते सहारनपूर पॅसेंजर. 11 नोव्हेंबर ते 8 फेब्रुवारी
ट्रेन नंबर- 12687. मुदरई ते डेहराडून चंदीगढ एक्सप्रेस. 6 नोव्हेंबर ते 2 फेब्रुवारी.
ट्रेन नंबर- 12688. डेहराडून चंदीगढ मुदरई एक्सप्रेस. 11 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारी.

ट्रेन नंबर- 12017 नवी दिल्ली ते डेहराडून शताब्दी एक्सप्रेस 10 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारीपर्यंत हरिद्वार ते डेहराडून पर्यंत बंद राहिल. ट्रेन नंबर 12018 डेहराडून ते न्यू दिल्ली शताब्दी एक्सप्रेस 10 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारीपर्यंतपर्यंत आंशिक रुपाने बंद राहिल. ही ट्रेन ओल्ड डेहराडून पर्यंत चालू राहिल.

ट्रेन नंबर- 14712 श्रीगंगा नगर हरिद्वार इंटरसिटी एक्सप्रेस 10 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारीपर्यंत अंबाला कॅंट पर्यंत काही काळासाठी बंद असेल. अंबाला कँट ते हरिद्वारनंतर ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

याचप्रमाणे 12054 अमृतसर हरिद्वार जनशताब्दी एक्सप्रेस 10 नोव्हेंबर ते 7 फेब्रुवारी पर्यंत सहारनपूरपर्यंत काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे आणि सहारनपूर ते हरिद्वार दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 12053 हरिद्वार अमृतसर जनशताब्दी एक्सप्रेस 10 नोव्हेंबर ते 7 फ्रेब्रुवारी पर्यंत जुन्या सहारनपूरपर्यंत धा आहे.

अंबालाचे सिनीयर डीसीएम हरि मोहन यांनी सांगितले की, गाड्या नोव्हेंबर महिन्यात रद्द केल्या जातील आणि फेब्रुवारीमध्ये पुन्हा सुरू केल्या जातील. डेहराडून रेल्वे स्टेशनच्या रिमॉडेलिंगमुळे रेल्वेने हे पाऊल उचललं आहे.

 

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like