वाढताना दिसतोय ‘कॉपर लिप्स’चा ट्रेंड, ओठांना ‘असं’ बनवा सुंदर ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मेकअपमध्ये लिपस्टिकचा मोठा रोल असतो. काही महिन्यांपूर्वी रोज गोल्ड खूप पसंत केला जात होता. गोल्ड रोज अंडरटोनसोबत कॉपर लिप्स आणि एक सोन्यासारखी मेटलिक चमक आपल्या आवडत्या मेकअप रंगांना एकत्र आणते. तर तुम्ही ही टीप कधी फॉलो केली नसेल तर आज आपण हेच जाणून घेऊयात की, कशा प्रकारे तुम्ही असा लुक करू शकता. सर्वात खास बात अशीय की, कॉपर लिप्स.

कॉपर लिप्ससोबत कसा मेकअप करायला पाहिजे ?

जर तुम्ही लिपस्टिक तुमची ओळख म्हणून लावत असाल तर आपल्या चेहऱ्यावर हायलाईटर लावू नका. जेव्हा तुम्ही कॉपर लिप ट्रेंड फॉलो करता तेव्हा बाकी मेकअप कमीत आणि साधा असू द्या. जेणेकरून फोकस ओठांवर राहिल. क्लासिक स्टाईलच्या पातळ आय लायनरसोबत लिप कलर किंवा कोणता न्यूड कलर आय शॅडो लावा जी तुमच्या लुकला नॅचरल ठेवेल.

आणखी काही टिप्स

सावधानता बाळगून लिपस्टिकचा योग्य वापर करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्हाला हे योग्य प्रकारे लावायला अडचण येत आहे तर ओठांवर ब्रशचा वापर करा. मॅटलिक शेडचा वापर करताना जर काही चूक होताना दिसत असेल तर तुम्ही सावध रहायला पाहिजे.