‘ट्रिपलिंग’ फेम मानवी गगरूचा धक्कादायक ‘खुलासा’ ! ‘कॉम्प्रोमाईज’ करण्यासाठी ऑफर झाले ‘तिप्पट’ पैसे

पोलीसनामा ऑनलाईन :कास्टींग काऊचबद्दल अनेक गोष्टी हळूहळू पुढे येताना दिसत आहेत. सिनेमात काम करणारी आणि वेब सीरिजसाठी फेमस असणारी अभिनेत्री मानवी गगरू हिनं अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. मानवीनं तिचा एक वर्ष जुना अनुभव सांगितला आहे. एकानं तिला वेब सारिजसाठी फोन केला. तो खूपच कमी पैसे देत होता. परंतु जेव्हा यावर बोलणं झालं तो कॉम्प्रोमाईज करण्याचं बोलू लागला.

एका मुलाखतीत बोलताना मानवी म्हणाली, “एका वर्षांपूर्वी मला एकाचा कॉल आला. मी त्याला ओळखत नव्हते. त्यानं मला वेब सीरिज करायची आहे असं सांगत त्याचं बजेट सांगितलं. मी त्याला म्हणाले की, हे खूप कमी आहे आणि तसंही तू बजेटचं सांगण्याआधी मला स्क्रिप्ट सांग. मला आवडली तर पुढे बोलूयात. त्यानं विचारलं की, या बजेटवर काम करण्यासाठी तू तयार आहेस का. मी नकार दिला. नंतर त्यानं बजेट 3 पटीनं वाढवलं आणि म्हणाला तुला कॉम्प्रो(कॉम्प्रोमाईज) करावं लागेल.”

मानवी पुढे म्हणाली, “मी कॉम्प्रो हा शब्द 7-8 वर्षांनंतर ऐकला. मला प्रचंड राग आला होता. मी त्याला ओरडून म्हणाले फोन ठेव. तुझी हिंमत कशी झाली. मी पोलिसांना सांगणार आहे.”

https://www.instagram.com/p/B9ojVU8JBrt/

मानवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर टीव्हीएफची वेब सीरिज ट्रिपलिंग मधील तिचं काम सर्वांनाच आवडलं होतं. आता ती अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज फोर मोर शॉट्स प्लिज मध्ये दिसणार आहे. याचा पहिला सीजन आधीच आला आहे.

View this post on Instagram

CREW #spokenfest2020

A post shared by Maanvi Gagroo (@maanvigagroo) on