महामार्गावर ट्रकचालकाला लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे फाटा जवळ ट्रक चालकाला बेदम मारहाण करत ८० हजार रुपये चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. गुरदा जाट (वय ३८ रा.शिवपूरी, मध्यप्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध नरढाणा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरदा जाट हे कांदा भरलेला ट्रक घेऊन जात होते. मुंबई – आग्रा मार्गावरुन जात असताना त्यांच्या ट्रकच्या ताडपत्रीची दोरी सैल झाली. ती व्यवस्थित बांधण्यासाठी त्यांनी बाभळे फाट्याजळील अन्नपूर्णा हाॅटेलजवळ ट्रक थांबविला. त्यावेळी ट्रकरची दोरी पक्की बांधत असताना चार जणांनी येऊन गुरदा जाट यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर ट्रकमधील रोख रक्कम ८० हजार रुपये, वाहन चालविण्याचा परवाना, मोबाईल, डिझेल खरेदी करण्याचे कार्ड घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर जाट यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नरढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास नरढाणा पोलीस करत आहेत.

दरम्यान, नाशिक परिक्षेञातील विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा दौऱ्यावर आले होते. चोरट्यांनी ही लुट करत त्यांना जणू सलामीच दिली.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही