कोयता गॅंगच्या दोन म्होरक्यांना अटक

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन- सातारा रस्त्यावर धूमाकूळ घालणाऱ्या कोयता गॅंगच्या मुख्य दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. विकास गोविंद कांबळे उर्फ थापा व विनय मारुती कांबळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या जुन्या वादातून जनता वसाहत येथे दोन तरुणांवर विकास कांबळे, विनय कांबळे व त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनी कोयते हातात घेऊन सोमवारी रात्री हल्ला केला होता. त्यानंतर त्यातील इतर दोघे सातारा रस्ता परिसरात असल्याचे कळल्यावर त्यांनी त्या दोघांवर हल्ला करण्यासाठी तेथे जाऊन कोयत्याने वार केले होते. त्यानंतर तेथे कोयत्यांनी धुमाकूळ घातला होता. याप्रकऱणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पाच अल्पवयीनांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुन्हे शाखेची विविध पथके त्यांचा शोध घेण्याचे काम करत होते.त्यावेळी युनीट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम , पोलीस नाईक सचिन गायकवाड, विल्सन डिसूजा हे त्यांचा शोध घेत असताना त्यांना विकास कांबळे हा सिंहगड रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यानी तेथे सापळा रचून त्याला अटक केली.

तर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व कर्मचारी त्यांचा शोध घेत असताना विनय मारुती कांबळे हा लोहीयानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यानी त्याला तेथून अटक केलीय