मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज सकाळापासून विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोणाला किती जागा मिळाल्या आहेत हे समोर येत आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं जे प्रेम दिलं त्यांबद्दल मी जनतेचे आभार मानतो. भाजपला आतापर्यंत 100 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. सर्वांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षांना काही जागा निश्चित जास्त मिळाल्या आहेत. परंतु या जागा एवढ्याही जास्त नाहीत. भाजपला मागील निवडणुकीचा विचार करता जास्त मतं आणि जास्त स्ट्राईक रेट मिळाला आहे. येणाऱ्या 5 वर्षात आम्ही जनतेची कामे पूर्ण करू असा मी विश्वास देतो.”
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही यावेळी 164 जागा लढवूनही आम्हाला 26 टक्के मतं मिळाली आहेत. परंतु दोन निकाल हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक होते. एक म्हणजे साताऱ्यातील पोटनिवडणूक ज्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. दुसरा म्हणजे परळी मतदारसंघ ज्यात पंकजा मुंडेंना पराभव पत्करावा लागला. आम्हाला पूर्ण विश्वास होता की, पंकजा मुंडे परळीतून उदयनराजे साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत निवडून येतील परंतु दोघेही निवडून येऊ शकले नाही.
ज्या उमेदवारांचा पराभव झाला आहे त्यांच्याबद्दल आम्ही योग्य वेळ आल्यानंतर याबाबतचे विश्लेषण करू असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –