गोदावरीत दोन शाळकरी मुले बुडाली

वैजापूर : पोलीसनामा आॅनलाईन

श्रावण महिन्या निमित्त गोदावरी नदीत स्नान करुन देवाला पाणी घालण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले बुडाल्याची दुर्देवी घटना वैजापूर तालुक्यातील बाबतारा येथे घडली आहे. विवेक कालीचरण कुमावत (वय १४) आणि तुषार सतिश गांगड (वय १४) अशी बुडालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. आज (सोमवार) रोजी हा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही मुलांचा शोध सुरू असून, अद्याप ते मिळाले नाहीत.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’576903c2-a9d8-11e8-9d4d-ad4837d6c922′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रावण महिना असल्यामुळे हे दोघे दररोज सकाळी गोदावरी नदीत अंघोळ करुन देवाला पाणी घालण्यासाठी मंदिरात जात असत. आज देखील सकाळी 7 च्या सुमारास नेहमीप्रमाणेच विवेक व तुषार नदीवर गेले होते. मात्र नदीतून आंघोळ करुन बाहेर येत असताना पाय घसरुन पडून नदीच्या प्रवाहात वाहून गेले.

यावेळी काही अंतरावर असणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने ते बुडत असल्याचे पाहून आरडाअोरडा केला. यानंतर ग्रामस्थ गोळा झाले मात्र नदीतील पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे ते दोघे वाहून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच वैजापूर व वीरगाव पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांचा शोध सुरू केला आहे, मात्र सहा तासांचा कालावधी उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. नदीपात्रातील खड्डे आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे तपासकार्यात अडचणी येत आहेत.

इतर बातम्या

गोध्रा हत्याकांड प्रकरणी कोर्टाचा मोठा निकाल, तब्बल 18 वर्षानंतर 2 आरोपींना जन्मठेप

भाजपचा ‘हा’ आमदार म्हणतो, हिंदूच्या भावना दुखावल्या तर केरळसारखी शिक्षा मिळेल