मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत : मुख्यमंत्री 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षण प्रश्नाबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीदरम्यान मराठा आरक्षण प्रश्नी सर्वांचे एकमत झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठा आरक्षण प्रश्नी अहवाल मागासवर्गीय आयोगाला पाठवला आहे. आयोगाचा अहवाल आल्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलावून कायदा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच  हा कायदा कोर्टात टिकला पाहिजे. त्यासाठी ज्या त्रुटी राहिल्या असतील  त्या दूर करू. असे मुख्यमंत्र्यानी मुंबईत बोलताना सांगितले.
[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’15249412-9269-11e8-8583-213fe3dbca7f’]
सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, “याआधी मराठा समाजाने ५४ मोर्चे शांततेत पार पडले आहेत, याचे कौतुक आहे. आंदोलनाच्या काळात पोलिसांवरील हल्ला, जाळपोळ, मारहाण असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. विनाकारण कुणालाही अडकवू नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली. सरकारने वेळोवेळी मराठा आरक्षण प्रश्नी निर्णय घेतला आहे. त्यानंतर न्यायालयाकडे हा प्रश्न पाठवण्यात आला. न्यायालयाने घोषणेला स्थगिती दिली त्यानंतर  याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्यात आली. पुन्हा उच्च न्यायालयाकडे आम्ही गेलो. आता अहवाल मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला आहे. लवकरच याचा निर्णय होईल “.
राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. त्यामुळे या भरतीबाबत संभ्रमाची स्थिती आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
याबरोबरच आंदोलनात अपप्रवृत्ती घुसल्या आणि आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न  केला गेला असा संशय मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अडचणी समजून घ्याव्यात, हिंसाचार करू नये असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यानी केले.
[amazon_link asins=’B07B4LG2NV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d1a14b3-9269-11e8-9963-8f2d7fe5fb75′]