अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई येथील घाटकोपर पूर्वमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादाय घटला घडली आहे. कामराजनगर भागात राहणाऱ्या कुटुंबाने जेवणाच्या वेळी चहा आणि पाव खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. यामध्ये साडेतीन आणि साडेचार वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb8b0893-c0b5-11e8-9e78-b9bad530ea18′]

नंदन इंदर यादव (वय – साडेतीन वर्षे), किशोर इंदर यादव (वय-साडेचार वर्षे) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. तर रोहित यादव (वय-१२) आणि कृष्णा यादव (वय-८) यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अभाविप’चा राडा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी या कुटुंबाने जेवणाच्या वेळी चहा आणि पाव खाल्ला होता. पहाटे तीनच्या सुमारास नंदन यादवला त्रास होत असल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आठ वजता किशोरला राजावाडी रुग्णालायत उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान किशोर याचा मृत्यू झाला. तर रोहित आणि कृष्णा या दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या दोन चिमुरड्यांना विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4b2535a-c0b5-11e8-b3b0-633400ccbd5d’]

यादव यांची परिस्थिती हलाकीची आहे. त्यामुळे काल त्यांनी जेवणाच्या वेळी चहा आणि पाव खाल्ला होता. त्यामुळे हा भुखबळीचा प्रकार तर नाही ना अशी चर्चा सध्या कामराज नगरमध्ये आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येईल असे पंत नगर पोलिसांनी सांगितले. तसेच मृत नंदन या मुलीला थंडी वाजून ताप येत होता तर किशोरला आकडी मिरगीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजेल. कुटुंबातील अन्य दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. पंत नगर पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.