Pune : वीज अंगावर पडून 2 लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू !

भोर : पोलीसनामा ऑनलाइन – अवकाळी पावसाने रविवारीही जिल्ह्यात हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी उभी पिके भूईसपाट झाली आहे शेतपिकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी भोर तालुक्यातील नसरापुर-चेलाडी परिसरात येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. दोन लहान मुलींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे तर एक मुलगी जखमी जाळायचे समोर आले आहे.

सीमा अरुण हिलम (वय ११) व अनिता सिंकदर मोरे (वय ९, दोघी रा.चेलाडी, नसरापूर) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. तर चांदणी प्रकाश जाधव (वय ९ ) ही मुलगी यातून सुदैवाने बचावली आहे. मात्र, ती जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेली, माहिती अशी की, रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वार्यास सुरुवात झाली होती.

दरम्यान या तिन्ही मुली घरापासून जवळ असलेल्या डोंगरालगत खेळत होत्या. त्याचवेळी वीज मुली खेळात असलेल्या ठिकाणी पडली. सीमा आणि अनिता या दोघी भाजल्या तर चांदणी जखमी होऊन बेशुद्ध झाली होती. हि घटना घरातील लोकांनाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिघीनांही रुग्णालयात दाखल केले. परंतु दोन मुलींचा पुचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जालिंदर बरकडे, यांनी घटनेची पहाणी केली. तर पीडित कुटुबांची माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे, भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी भेट घेतली.